पुणे | ८.३ | रयत समाचार
(Religion) स्वामीराज चंद्रकला सूर्यकांत भिसे यांच्या ‘रिंगण’मधील लेखांचा संग्रह असलेल्या ‘जाता संतांच्या गावा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ता. ८ मार्च रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. वैचारिक आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या या लेखांना आता पुस्तकाचे स्वरूप मिळत असल्याने साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
(Religion) पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
(Religion) याशिवाय वार्षिक ‘रिंगण’चे संपादक सचिन परब, खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. संजय चाकणे तसेच कॅप्टन आमासिध्द भिसे हेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
हा प्रकाशन सोहळा रानडे इन्स्टिट्यूट सभागृह, फर्ग्युसन रोड, पुणे येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. स्वामीराज भिसे यांच्या ‘रिंगण’मधील निवडक लेखांना पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती सचिन परब यांनी दिली.
साहित्य, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



