Religion | ‘नवकार’ व ‘समवसरण’ तीर्थाचे उद्घाटन ; उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म.सा. आदी अनेक साधु-साध्वींच्या पावन सानिध्यात ऐतिहासिक अनुष्ठान

SubEditor | Dipak Shirasath

पाथर्डी | २.३ | रयत समाचार

(Religion) आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म.सा. यांची जन्मभूमी असलेल्या चिचोंडी (शिराळ), अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या ‘गुरु आनंद तीर्थ’ परिसरात रविवारी ता.१ मार्च रोजी ‘नवकार तीर्थ’ व ‘समवसरण तीर्थ’ यांचे भव्य अनुष्ठान आणि तीर्थद्वाराचे उद्घाटन मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्याला उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषिजी म.सा. आदि आदि १७ साधु-साध्वीचे पावन सान्निध्य लाभले हजारो भक्तांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता अनुष्ठानाला प्रारंभ झाला १० वाजता प्रवचन व सत्कार सोहळा संपन्न झाला.

(Religion) गुरु आनंद फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या तीर्थक्षेत्रात मानवसेवा, समाजप्रबोधन, शिक्षण, व्यक्ती- समाज विकास आणि कल्याणार्थ विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘सप्ततीर्थ’ संकल्पनेअंतर्गत येथे गुरु चरण तीर्थ, साधू भवन- साध्वी भवन, भक्त निवास, भोजनशाळा आदी कामे पूर्ण झाली असून, नवकार कलश तीर्थ, गौतमलन्धी कलश, श्रुतपीठ, पुरुषाकार अष्टमंगल ध्यान केंद्र, गर्भसंस्कार केंद्र, संलेखणा केंद्र आदी कामे प्रगतीपथावर आहेत.

(Religion) यापैकी नवकार तीर्थ व समवसरण तीर्थाचे बांधकाम पूर्ण झाले असून, स्थानकवासी समाजात प्रथमच अशा स्वरूपाचे अद्भुत व ऐतिहासिक अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे. नवकार तीर्थामध्ये अखंड २४ तास नवकार महामंत्राचे उद्‌घोषण होणार असून, मंत्रशक्तीचे जागरण केले जाणार आहे. तर समवसरण तीर्थात अखंड श्रुतधारा पठणाद्वारे प्रभूभक्ती साकारली जाणार आहे.
या महोत्सवाला अर्हम् विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. (आदि ठाणा २), पू. श्री प्रितीदर्शनाजी म.सा. (आदि ठाणा ५), मधुरवक्ता डॉ. पू. श्री प्रणवदर्शनाजी म.सा. (आदि ठाणा ४) तसेच जिनशासन गौरव पू. श्री सुनंदाजी म.सा. (आदि ठाणा ६) यांचे पावन सान्निध्य लाभले. देशभरातून गुरु भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
नवकार तीर्थ निर्मितीचा लाभ स्व. छटाकीबाई बाबूलालजी मुथा यांच्या स्मरणार्थ पुणे येथील उद्योजक सुभाष व प्रशांत मुथा परिवार यांनी घेतला. नवकार तीर्थ अनुष्ठानाचा लाभ पुणे येथील दिपचंद, सुनिल, सुरज पारख परिवारांनी घेतला असून, कलश उद्घाटनाचा लाभ चेन्नई (पोरूर) येथील महावीरचंद कांकरिया परिवाराने घेतला आहे.
समवसरण तीर्थाचा लाभ चेन्नई येथील स्व. नवरतनसा चोरडिया यांच्या स्मरणार्थ श्रीमती कांताबाई, अजित, भरत चोरडिया परिवारांनी घेतला आहे. समवसरण तीर्थ अनुष्ठानाचा लाभ स्व. पुष्पादेवी माणिकचंदजी दुगड यांच्या स्मरणार्थ पुणे येथील दुगड परिवाराने घेतला असून, कलश द्वार उद्घाटनाचा लाभ अहिल्यानगर येथील श्रीमती लिलाबाई मोहनलालजी डुंगरवाल यांच्या स्मरणार्थ डुंगरवाल परिवाराने घेतला आहे.
गुरु आनंद तीर्थ येथे अक्षय तृतीया, ता.२० एप्रिल २०२६ रोजी १००८ वर्षीतप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक महोत्सवात सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुरु आनंद फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२३९९८८ / ९८५०७१४१६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले.

Religion

Contents
पाथर्डी | २.३ | रयत समाचार(Religion) आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म.सा. यांची जन्मभूमी असलेल्या चिचोंडी (शिराळ), अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या ‘गुरु आनंद तीर्थ’ परिसरात रविवारी ता.१ मार्च रोजी ‘नवकार तीर्थ’ व ‘समवसरण तीर्थ’ यांचे भव्य अनुष्ठान आणि तीर्थद्वाराचे उद्घाटन मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्याला उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषिजी म.सा. आदि आदि १७ साधु-साध्वीचे पावन सान्निध्य लाभले हजारो भक्तांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता अनुष्ठानाला प्रारंभ झाला १० वाजता प्रवचन व सत्कार सोहळा संपन्न झाला.(Religion) गुरु आनंद फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या तीर्थक्षेत्रात मानवसेवा, समाजप्रबोधन, शिक्षण, व्यक्ती- समाज विकास आणि कल्याणार्थ विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘सप्ततीर्थ’ संकल्पनेअंतर्गत येथे गुरु चरण तीर्थ, साधू भवन- साध्वी भवन, भक्त निवास, भोजनशाळा आदी कामे पूर्ण झाली असून, नवकार कलश तीर्थ, गौतमलन्धी कलश, श्रुतपीठ, पुरुषाकार अष्टमंगल ध्यान केंद्र, गर्भसंस्कार केंद्र, संलेखणा केंद्र आदी कामे प्रगतीपथावर आहेत.(Religion) यापैकी नवकार तीर्थ व समवसरण तीर्थाचे बांधकाम पूर्ण झाले असून, स्थानकवासी समाजात प्रथमच अशा स्वरूपाचे अद्भुत व ऐतिहासिक अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे. नवकार तीर्थामध्ये अखंड २४ तास नवकार महामंत्राचे उद्‌घोषण होणार असून, मंत्रशक्तीचे जागरण केले जाणार आहे. तर समवसरण तीर्थात अखंड श्रुतधारा पठणाद्वारे प्रभूभक्ती साकारली जाणार आहे.या महोत्सवाला अर्हम् विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. (आदि ठाणा २), पू. श्री प्रितीदर्शनाजी म.सा. (आदि ठाणा ५), मधुरवक्ता डॉ. पू. श्री प्रणवदर्शनाजी म.सा. (आदि ठाणा ४) तसेच जिनशासन गौरव पू. श्री सुनंदाजी म.सा. (आदि ठाणा ६) यांचे पावन सान्निध्य लाभले. देशभरातून गुरु भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.नवकार तीर्थ निर्मितीचा लाभ स्व. छटाकीबाई बाबूलालजी मुथा यांच्या स्मरणार्थ पुणे येथील उद्योजक सुभाष व प्रशांत मुथा परिवार यांनी घेतला. नवकार तीर्थ अनुष्ठानाचा लाभ पुणे येथील दिपचंद, सुनिल, सुरज पारख परिवारांनी घेतला असून, कलश उद्घाटनाचा लाभ चेन्नई (पोरूर) येथील महावीरचंद कांकरिया परिवाराने घेतला आहे.समवसरण तीर्थाचा लाभ चेन्नई येथील स्व. नवरतनसा चोरडिया यांच्या स्मरणार्थ श्रीमती कांताबाई, अजित, भरत चोरडिया परिवारांनी घेतला आहे. समवसरण तीर्थ अनुष्ठानाचा लाभ स्व. पुष्पादेवी माणिकचंदजी दुगड यांच्या स्मरणार्थ पुणे येथील दुगड परिवाराने घेतला असून, कलश द्वार उद्घाटनाचा लाभ अहिल्यानगर येथील श्रीमती लिलाबाई मोहनलालजी डुंगरवाल यांच्या स्मरणार्थ डुंगरवाल परिवाराने घेतला आहे.गुरु आनंद तीर्थ येथे अक्षय तृतीया, ता.२० एप्रिल २०२६ रोजी १००८ वर्षीतप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक महोत्सवात सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुरु आनंद फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२३९९८८ / ९८५०७१४१६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले.

हे ही वाचा : Literature | प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा – डॉ. महावीर अक्कोळे

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading