World news | कान्स World Film Festival च्या नामांकनांत सुर्योदयसिंग मन्न यांचा चित्रपट; My Sweet Paro- Remembering a Matriarch ला नामांकन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कान्स | २३.२ | रयत समाचार

(World news) येथे आयोजित World Film Festivalच्या जानेवारी २०२६ साठी जाहीर झालेल्या नामांकनांमध्ये भारताचा उल्लेखनीय ठसा उमटला आहे. Best Documentary Short या विभागात भारतीय दिग्दर्शक सुर्योदय सिंग मन्न यांच्या My Sweet Paro- Remembering a Matriarch या माहितीपटाला नामांकन मिळाले असून, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

(World news) जगभरातील विविध देशांतील चित्रपट या महोत्सवात स्पर्धेत असतात. यंदा अमेरिकेतील Love (Nonfiction) – Episode One: Soulmates, चीनमधील Svteung Mvli: The Land of the Living आणि The People in the Time Tunnel यांच्यासह भारताचा माहितीपट अंतिम नामांकनांत झळकला आहे.

(World news) विशेष म्हणजे, काही गटांमध्ये थेट विजेते निवडण्यात आले असून ते नामांकन यादीत नसतील. सर्व विजेत्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याने चित्रपटसृष्टीत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारतीय विषय, संवेदनशील कथनशैली आणि जागतिक पातळीवर पोहोचणारी मांडणी यामुळे My Sweet Paro या माहितीपटाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. कॅन्समधील या यशामुळे भारतीय स्वतंत्र चित्रपटांना आंतरराष्ट्रीय मंचावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जानेवारी २०२६ च्या विजेत्यांची घोषणा आता काही क्षणांचीच बाब असून, भारतीय चित्रपटाला सुवर्णक्षण लाभतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
World news
माय स्वीट पारो – रिमेंबरिंग अ मेट्रीआर्क हा चित्रपट पहाण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करावा

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading