Press | राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अण्णासाहेब बनसोडे

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २०.२ | रयत समाचार

(Press) सामान्यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून प्रभावी आवाज देणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कर्तव्यनिष्ठ पत्रकार अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण सहभाग आणि संघटनात्मक कार्यतत्परता लक्षात घेऊन संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी एकमताने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

(Press) अण्णासाहेब बनसोडे यांनी आपल्या निर्भीड आणि तडफदार पत्रकारितेमुळे नेहमीच जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनातील त्रुटी असोत किंवा सामाजिक प्रश्न, त्यांनी ठामपणे मांडणी करत सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहण्याची परंपरा जपली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

(Press) संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अण्णासाहेब बनसोडे हे अभ्यासू, निष्ठावान आणि समाजनिष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक सक्षम होईल आणि संघटनेची ताकद वाढेल.
ही निवड संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार महाजन, संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदुवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल आणि राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अढांगळे, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजुमले व प्रितमसिंग चौहान, अत्याचार निवारण समितीचे राज्याध्यक्ष दत्ता पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज बाबा वाघ आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत करून बनसोडे यांचे अभिनंदन केले.

अण्णासाहेब बनसोडे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading