Education | 14 फेब्रुवारीला अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी स्नेहमेळावा; आठवणींना उजाळा देणारा भव्य सोहळा

नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १३.२ | रयत समाचार

(Education) भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या अहमदनगर महाविद्यालयाच्या समृद्ध परंपरेतून घडलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि मैत्रीचे धागे अधिक घट्ट करणारा माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा शनिवारी ता. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ भेटीगाठीचा कार्यक्रम नसून, महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षण, गुरुजनांचे मार्गदर्शन, जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी आणि विविध पिढ्यांतील विद्यार्थ्यांचा संवाद यांचे एक भावनिक पर्व ठरणार आहे.

(Education) माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा १४ फेब्रुवारीला : अहमदनगर महाविद्यालय आणि अहमदनगर माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते २०२४ पर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी सांगितले, हा मेळावा माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणणारा, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

(Education) उद्घाटन डॉ. रजनीश बानबिस यांच्या हस्ते : या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सकाळी ११.३० वाजता बी.पी.एच.ई.चे डॉ. रजनीश बार्नबस यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटनानंतर विविध सत्रांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, जुन्या आठवणींचा संवाद, स्नेहभोजन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मैत्री, आठवणी आणि प्रेरणादायी संवादाचा मंच : महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, गुरुजनांचे योगदान, मित्रमैत्रिणींसोबतचे अनुभव आणि जीवनप्रवासातील प्रेरणादायी क्षण शेअर करण्यासाठी हा मेळावा एक उत्कृष्ट मंच ठरणार आहे.

या कार्यक्रमामुळे विविध पिढ्यांतील विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढेल आणि महाविद्यालयाशी नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध : या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी आयोजकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, उपस्थिती नोंदविण्यासाठी लिंकद्वारे नोंदणी करता येणार आहे. लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScYnaOKYxppTiO0vf2Lt5lZdM-fcyOpx6zG98hh_vrhAJH3ZQ/viewform?usp=header Education
अहमदनगर महाविद्यालयाच्या इतिहासात हा स्नेहमेळावा एक संस्मरणीय पर्व ठरणार असून, माजी विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत भावनिक व प्रेरणादायी अनुभव देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading