गुवाहाटी | ३०.१ | रयत समाचार
(India news) आसाममधील गुवाहाटी येथे नीलांचल पर्वतावर वसलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी प्रमुख असलेल्या कामाख्या माता मंदिरात महाराष्ट्रातील मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी दर्शन घेतले. या पवित्र दर्शनानंतर मनाला अपार शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
(India news) कामाख्या माता मंदिर हे शक्ती उपासनेचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असून देशविदेशातून भाविक येथे श्रद्धेने ‘नवस फेडण्यासाठी’ येतात. नीलांचल पर्वतावर वसलेल्या कामाख्या माता मंदिर परिसरात अध्यात्मिक वातावरण अनुभवास येते.
(India news) दर्शनानंतर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कामाख्या मातेकडे नतमस्तक होताना अंतःकरणात शांतता लाभली आणि ‘पुढील कार्यासाठी’ नवी ऊर्जा मिळाली. या पवित्र स्थळी केलेल्या भेटीचा अनुभव अविस्मरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
