Education | बीडच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिले ‘सुधागड विद्या संकुल’ने शैक्षणिक साहित्य

उपसंपादक | दिपक शिरसाठ

नवी मुंबई | २२.११ | सोपान आडसरे

(Education) परतीच्या मान्सून पावसाने राज्यातील घाटमाथ्यावरील अनेक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर तडाखा दिला. बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये व विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तके, वह्या, दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. ही गरज ओळखून कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा पुढाकार घेतला.Education

(Education) विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मदत म्हणून शैक्षणिक साहित्य गोळा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेने खोडरबरपासून दप्तरापर्यंत विविध साहित्याचे एकूण ३०० किट तयार केले. ही किट्स २४ मोठ्या बॉक्समध्ये भरून बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या.Education

(Education) महसूल तहसिलदार नरेंद्र कुलकर्णी यांच्यामार्फत ही मदत बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या स्वाधीन करण्यात आली. जिल्हाधिकरी जॉन्सन यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले तसेच कौतुक प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त केले.

राष्ट्रीय आपत्ती आणि संकटाच्या काळात मदतकार्य करण्याची परंपरा जपणाऱ्या सुधागड विद्या संकुलाच्या या उपक्रमाचे बीड व रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article