मुंबई | ०७.११ | गुरूदत्त वाकदेकर
(Cultural Politics) मुंबईतील एशियाटिक सोसायटीची ता. ८ नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय समितीच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मतदारयादीत गंभीर अनियमितता आढळल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
(Cultural Politics) व्यवस्थापकीय समिती सदस्या उमेदवार डॉ. कुंदा पीएन यांनी मतदारयादीत अनेक त्रुटी असल्याची तक्रार केली. काही निष्क्रिय तसेच मृत सदस्यांची नावे यादीत असल्याचे आढळले आहे. अंदाजे १०० हून अधिक सदस्यांची नावे गैरसोयीने यादीत समाविष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला.
(Cultural Politics) यासंदर्भात व्यवस्थापकीय समिती सदस्य उमेदवार डॉ. कुंदा पीएन यांनी अधिकाऱ्यांना लेखी आक्षेप नोंदविला असून, जाहीर केलेली मतदारयादी व्यवस्थापकीय समितीने मंजूर केलेली नसल्याने ती अवैध असल्याचे म्हटले.
मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने निवडणूक तहकूब करण्यात आल्याचे सोसायटीने स्पष्ट केले आहे. तसेच व्यवस्थापकीय समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या ता.६ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशाचीही नोंद घेतली असून, त्यानुसारही मतदारांच्या यादीची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ते निर्णय घेतल्यानंतर पुढील तारीख निश्चित केली जाईल, तोपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, असे कळविले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
