राहुरी | ३१.१० | रयत समाचार
(Sports) तालुक्यातील सात्रळ येथील बापूजी सहादू कडू पा. कनिष्ठ महाविद्यालय अकरावीतील विद्यार्थी सार्थक प्रकाश गागरे याने ७०व्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. राज्यात तिसरा क्रमांक पटकावत जिल्ह्याचा आणि महाविद्यालयाचा गौरव वाढविला.
(Sports) या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, प्राचार्य प्रा. सिताराम गारुडकर, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, प्रा. दिघे व्ही.बी., तसेच क्रीडा विभागप्रमुख प्रा. पुरब सुर्यवंशी यांनी सार्थकचे कौतुक करत अभिनंदन केले.
(Sports) त्यांनी सांगितले की, सार्थकची खेळातील मेहनत, शिस्त आणि नेतृत्वगुणामुळे जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. अशा विद्यार्थ्यांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडाप्रेम आणि स्पर्धात्मकता वाढीस लागते.
सार्थकच्या यशाबद्दल सेवकवृंद, शालेय समिती सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच सात्रळ, सोनगाव, धानोरे, पाथरे, हनुमंतगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
