मुंबई | ११.१० | गुरूदत्त वाकदेकर
(World news) ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ निमित्त एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात काल ता.१० रोजी आयोजित कार्यक्रमात ‘मनोआरोग्य आणि विनोद’ या विषयावर विचारमंथनाचा सुंदर सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सचिन गोस्वामी उपस्थित होते.
(World news) सुरूवातीला दीपप्रज्वलन करून कुलगुरू डॉ. चक्रदेव मॅडम, कुलगुरू डॉ. निलेश ठाकरे, डॉ. नांदवडेकर, डॉ. प्रभू तेंडुलकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. रामटेके आणि शाम राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
(World news) यावेळी मनोआरोग्य आणि विनोद या विषयावर सचिन गोस्वामी यांनी आपल्या अनुभवसंपन्न विचारांची मांडणी करत, जीवनात विनोदबुद्धी कशी मानसिक आरोग्यास पोषक ठरते यावर प्रभावी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, हास्य ही फक्त प्रतिक्रिया नसून, ती मानसिक संतुलन राखण्याची जीवनशैली आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, चर्चासत्रादरम्यान अनेक विचारविनिमय झाले. शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत “चिंतन, मंथन आणि आनंद” यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम टाळ्यांच्या गजरात यशस्वीरीत्या पार पडला.