Politics | कर्जत-जामखेड तालुक्यात महिला बचत गटांना तब्बल ४९ कोटींचं कर्ज वितरण

जामखेड | रिजवान शेख

(Politics) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल उचलत सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यातील महिला बचतगटांना आज २ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज विविध व्यवसायांसाठी वाटप करण्यात आले. या नवीन टप्प्यानंतर कर्जत आणि जामखेड तालुक्यांतील महिला बचतगटांना व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाची एकूण रक्कम तब्बल ४९ कोटी रुपयांवर पोहोचली. हा विक्रमी टप्पा मतदारसंघात प्रथमच गाठला गेला आहे.

(Politics) या उपक्रमामुळे शेकडो महिलांनी लघुउद्योग, पशुपालन, किराणा, शिवणकाम, तसेच स्थानिक उत्पादन व्यवसायात उतरून आपला आर्थिक पाया भक्कम केला आहे. महिलांच्या या आत्मनिर्भर प्रवासाचे कौतुक करत सुनंदा पवार यांनी महिला बचतगटांच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

(Politics) यावेळी स्थानिक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपक्रमामुळे ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ अधिक जोमाने पुढे सरकत असून, “महिला सक्षम, कुटुंब समृद्ध” हा संदेश प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दृश्य दिसत आहे.
TAGGED:
Share This Article