Mumbai news | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सुरू; देशाच्या विकासाच्या नव्या उड्डाणाला प्रारंभ ?

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

नवी मुंबई | ०८.१० | रयत समाचार

(Mumbai news) देशाच्या पायाभूत विकासाच्या नव्या पर्वाला प्रारंभ करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक कलादालने आणि पर्यावरणपूरक रचनेने सजलेल्या या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी होणार आहे.

(Mumbai news) कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राची औद्योगिक, पर्यटन आणि व्यापार क्षेत्रातील झेप आणखी वेगवान होणार असल्याचा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला.

(Mumbai news) नवी मुंबई विमानतळ अत्याधुनिक सुविधा, स्मार्ट तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीचा वारसा दर्शविणाऱ्या कलात्मक स्थापत्यांनी सजलेला आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाकाठी २० दशलक्ष प्रवाशांची क्षमता असलेला हा विमानतळ भविष्यात देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय हब ठरणार आहे.
 या विमानतळामुळे नवी मुंबई, रायगड आणि ठाणे परिसरातील विकासाला नवी गती मिळणार असून, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विस्तारासाठी नवे दरवाजे उघडले जाणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ प्रकल्प नाही, तर ‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे, असे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading