India news | दसऱ्याला ‘सोने लुटलं गेलं ते हक्काच्या अन्नधान्याचे आणि माणुसकीच्या नात्याचे; पुरग्रस्त शेतमजूर आदिवासींना किराणा वितरण

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

नगर तालुका | ०२.९ | रयत समाचार

(India news) दसरा सणाच्या दिवशी दैनिक रयत समाचार टीमने लोकसहभागातून संकलित केलेला किराणा पिंपळगाव माळवी परिसरातील पुरग्रस्त भिल्ल आदिवासी शेतमजूर बंधूभगिनींना वितरीत केला.

 

(India news) या उपक्रमासाठी डॉ. रविकांत पाचारणे आणि सहकारी, कविता कराळे आणि सहकारी, शिक्षिका ललिता केदारे, ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, छायाचित्रकार संजय वाघ, इंजि. प्रशांत पाटील, अभिजित अनाप साहेब, दत्ताभाऊ वडवणीकर, विष्णू भुतकर (निशांत झोपडी कँटिन संचालक) यांच्यासह अनेक जाणत्या व्यक्तींनी सहकार्य केले.

 

(India news) टीम रयत समाचारचे संतोष गायकवाड, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, अतुल देठे, विजय केदारे, पंकज गुंदेचा, मरयम सय्यद, एस्थर ऱ्होलुपुई, बिजेएमसीच्या विजयाताई काळे, नवनाथ मगर, किपर आदींचे सहकार्य आहेच तसेच सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सॅम्युअल वाघमारे, प्रा. सुरेश मुगुटमल, लोकमतचे सुधीर लंके, पत्रकार खासेराव साबळे आणि एमएसडब्ल्यू विद्यार्थी देखील याकामी सोबत होते.

 

अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कारागिरांचे संसार उद्ध्वस्त झाले. कामे बंद पडल्याने चुली विझल्या, लेकरांची शाळा बंद झाली, आयाबायांच्या डोळ्यात काळोख दाटला. शासनाकडून मदतीची प्रतीक्षा असतानाच, ‘मिशन माणुसकी’ म्हणून किराणा पोहोचल्यावर आदिवासी वस्त्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.
म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, लेकरांनी उड्या मारत आनंद साजरा केला. दसऱ्याच्या या सकाळी सोने लुटलं गेलं ते हक्काच्या अन्नधान्याचं आणि माणुसकीच्या नात्याचं!

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading