(Cultural Politics) शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभारात पारदर्शकता आणि शिस्तबद्धता यावी, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विश्वस्थ मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ११ सदस्यीय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली. विशेष म्हणजे या समितीत केवळ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असून, ट्रस्टचे सर्व व्यवहार ही समिती पाहणार आहे.
(Cultural Politics) उपजिल्हाधिकारी (भूमापन क्र. १) अतुल चोरमारे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, नेवासा तहसीलदार संजय बिरादार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहतील. याशिवाय गटविकास अधिकारी संजय लक्ष्मण लखवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, उपअभियंता विनायक पाटील, लेखाधिकारी गणेश खेडकर, उपकोषागार अधिकारी राजकुमार पुंड, नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, मंडळ अधिकारी विनायक गोरे, तलाठी सनील पवार व ग्रामसेवक दादासाहेब बोरूडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
(Cultural Politics) या समितीला ट्रस्टच्या सर्व आर्थिक व्यवहार, कामगारांना कर्मचारी यांचे प्रश्नांची सोडविणे, विकासकामे, धार्मिक व्यवस्थापन आणि दैनंदिन कार्यवाही पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शनिशिंगणापूरच्या लाखो भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करताना, ट्रस्टचा कारभार सरकारच्या थेट देखरेखीखाली नीटनेटका आणि पारदर्शक होणार का? अशी चर्चा शनिभक्तांमधे चालू आहे.