श्रीरामपूर | रयत समाचार
(Social) येथील अँकर असोसिएशनचा तिसरा वर्धापन दिन समारंभ तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच भूमिपुत्रांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष प्रा.ॲड. आदिनाथ जोशी यांनी दिली. आ. हेमंत ओगले यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप तसेच माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
(Social) यानिमित्त देवेंद्र शोभाताई बाबासाहेब औताडे (विंग कमांडर) शौर्य पदक- ऑपरेशन सिंदूर मोहीमेत सहभाग भारतीय वायूसेनेकडून सन्मान मिळाल्याबद्दल, व्यंकटेश रेखा रामपाल पांडे (युवा अभिनेता कलाकार) नुकतेच नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याबद्दल, मिलिंदकुमार सिंधुमती मारूतीराव साळवे (पत्रकार) बाल संगोपन निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून राज्यशासनाचे वतीने १०१ कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिल्याबद्दल, डॉ. सुधीर मंगल भास्कर गायके पाटील (प्राध्यापक) ग्रामीण भागातून असूनही अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चपदवी पीएच.डी. संपादन केल्याबद्दल, रूपाली व ऋषाकेश छाया हरिभाऊ औताडे दाम्पत्य यांनी नोकरी न करता आवडत्या व्यवसायात गरुडझेप घेतल्याबद्दल या भूमीपूत्रांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
(Social) कार्यक्रम शनिवारी ता. २३ ॲागस्ट सायंकाळी ४.३० वाजता आगाशे सभागृह आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालय, मेनरोड, श्रीरामपुर येथे होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन
कार्याध्यक्ष संतोष मते, उपाध्यक्ष प्रसन्न धुमाळ, सचिव ॲड. प्रवीण जमदाडे, खजिनदार प्रा. सतीश म्हसे, प्रसिद्धीप्रमुख विलास कुलकर्णी, सुकाणू समितीचे प्रा. ज्ञानेश गवले, सलिमखान पठाण, संगीता फासाटे, प्रा. लक्ष्मण कोल्हे, कार्यकारणी सदस्य दिलीप साळुंके, राजेंद्र हिवाळे, ॲड. अजय चौधरी, प्रा. विनायक कुलकर्णी, सीताराम कातोरे, अवधूत कुलकर्णी गणेश पिंगळे, मयूरी पिंगळे, प्रियंका यादव यांनी केले.
