अहमदनगर | रयत समाचार
(India news) महाराष्ट्र ॲण्ड गोवा ॲडव्होकेट्स बार कौन्सिलच्या चेअरमनपदी नुकतीच ॲड. अमोल सावंत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त ॲड. विक्रम वाडेकर यांच्या हस्ते, तसेच ॲड. पंकज खराडे, ॲड. सागर वाव्हळ, ॲड. प्रसाद गर्जे आणि ॲड. प्रल्हाद खंडागळे यांच्या उपस्थितीत ॲड. सावंत यांना पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
(India news) यावेळी मान्यवरांनी सांगितले की, ॲड. अमोल सावंत यांच्या नेतृत्वाखाली बार कौन्सिलची कामकाज पद्धती अधिक प्रभावी होईल. वकील बांधवांच्या न्यायासाठीच्या लढ्यात त्यांचे योगदान लक्षणीय ठरेल.
(India news) सत्काराला प्रतिसाद देताना ॲड. सावंत म्हणाले, ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे जनकर्तव्य आहे. महाराष्ट्र व गोव्यातील वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि न्यायालयीन व्यवस्थेतील सकारात्मक बदलांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.
