अहमदनगर | ०२ ऑगस्ट | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त
त्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करणात आले. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी लालटाकी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व इमारत कंपनी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोन्ही समाजसुधारक राष्ट्रपुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, सावेडी मंडलाध्यक्ष राजेंद्र काळे, केडगाव मंडलाध्यक्ष भरत ठुबे, महिला आघाडीच्या प्रिया जानवे, राहुल जामगावकर, धनंजय जाधव, मयूर ताठे, बाळासाहेब गायकवाड, गोपाल वर्मा, ज्ञानेश्वर धिरडे, अरुण शिंदे, राजू वाडेकर, महेश गुगळे, नीरज राठोड, हर्षल बोरा, पियुष जग्गी, प्रवीण ढोणे, दीपक उमाप, सुनील सकट, वसंत राठोड, ज्ञानेश्वर काळे, कैलास गर्जे, देवेंद्र बंब, मिलिंद भालसिंग, मुकुल गंधे, शिरीष जानवे, रुद्रेश अंबाडे, किशोर कटोरे, निरज राठोड, संपत नलावडे, वैभव जोशी, संजय ढोणे व पुंडलिक गदादे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
