पाथर्डी | १९ जुलै | प्रतिनिधी
(India news) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंबंधी, मानधन वाढ, ग्रॅज्युटी, गटविमा तसेच सानुग्रह अनुदान आदी मागण्यांसाठी एक संयुक्त निवेदन खा. भाऊसाहेब वाकचौरे व खा. निलेश लंके यांना देण्यात आले. यावेळी उदय देशपांडे, विजय गायकवाड, गोरक्षनाथ काळे, विनायक आडेप, डॉ. आशिष इरमल, संतोष तिळवले, संजय पालवे, शुभदा टेपाळे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
(India news) ता.१४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार १० वर्षे व अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे आदेश असूनही दीड वर्ष उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. विधिमंडळाच्या २०२५ च्या अधिवेशनातही याबाबत ठोस आश्वासन देण्यात आले होते.
(India news) एनएचएम कर्मचाऱ्यांना १०% मानधनवाढ, रॉयल्टी बोनस, ग्रॅज्युटी आणि ईपीएफ लागू करणे, अपघात झाल्यास ५० लाख सानुग्रह अनुदान किंवा अपंगत्वास २५ लाखाची तरतूद, गटविमा योजना, आशा व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान, सीएचओच्या मानधनात एकत्रित ४०,००० रु. देणे, समायोजन धोरण शिथिल करणे अशा अनेक मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.