(World news) नेपाळ आणि भारत यांच्यातील परंपरागत मैत्री व बंधूभावाचे नाते अधिक दृढ व्हावे यासाठी नवी दिल्लीतील नेपाळी दूतावास नेहमीच प्रयत्न करतो. भारतातील विविध राज्यातील तसेच गोव्यातील नेपाळी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दूतावास नेहमीच दक्ष राहील, अशी ग्वाही नेपाळी दूतावासचे उप मुख्याधिकारी डॉ. सुरेंद्र थापा यांनी येथे केले. नेपाळी दूतावास, किन इंडिया तथा गोव्यातील विविध नेपाळी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे आयोजित सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
(World news) यावेळी नेपाळी दूतावासचे द्वितीय सचिव उत्तम नेपुणे,यदुनाथ भट्टराय, मनोजकुमार सिंग, किन इंडियाचे संचालक नवीन जोशी, इंद्रराय भट्टराय, प्रगतीशील नेपाळी समाज भारतचे अध्यक्ष लोकेंद्र सेर्पाली, प्रकाश ओली, प्रकाश थापा, ॲड. श्रीनिवास खलप, पत्रकार प्रभाकर ढगे, शंकर किर्लपालकर आदी उपस्थित होते.
(World news) गोव्यातील नेपाळी समुदायासाठी कामगार जागरूकता हा कार्यक्रम नवी दिल्लीतील नेपाळी दूतावासाने आणि मानवी तस्करीविरुद्ध लढण्यासाठी सक्रिय असलेल्या किन इंडिया दिल्लीच्या सहकार्याने आयोजित केला होता. भारतातील नेपाळी कामगारांना भारतीय कामगार कायद्यांबद्दल माहिती देणे आणि त्यांना संवेदनशील करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नेपाळी दूतावासचे द्वितीय सचिव उत्तम नेपुणे, यदुनाथ भट्टराय म्हणाले, नेपाळी समुदायाला सुरक्षित स्थलांतराबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे. कारण सध्या, भारतातील विविध ठिकाणी रोजगारासाठी जाणाऱ्या नेपाळी कामगारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि काही नेपाळी लोक मानवी तस्करी आणि तस्करीला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. अशा जागरूकता कार्यक्रमांमुळे खूप मदत होईल अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमात ॲड. श्रीनिवास खलप यांनी नेपाळी नागरिकांना मोफत कायदा सल्ला उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली. पत्रकार प्रभाकर ढगे यांनी नेपाळी दूतावासाने देशभरातील नेपाळी नागरिकांच्या हिताची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक लोकेंद्र सेर्पाली यांनी तर डॉ. सुरेंद्र थापा यांनी आभार मानले.