अहमदनगर | १७ जुलै | प्रतिनिधी
(Education) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, आता अहिल्यानगर (पुर्वीचे नाव अहमदनगर) जिल्ह्याला नाशिक विभागीय केंद्राऐवजी पुणे विभागीय केंद्रामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सेवा अधिक सुलभ व प्रभावी होणार आहेत.
(Education) यापूर्वी नाशिक विभागीय केंद्राअंतर्गत नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे येत होते. दुसरीकडे पुणे विभागीय केंद्रामध्ये पुणे, सोलापूर आणि सांगली हे जिल्हे समाविष्ट होते. मात्र आता नव्याने झालेल्या रचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये व अभ्यास केंद्रे पुणे विभागीय केंद्राच्या अधिपत्याखाली काम करणार आहेत.
(Education) विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिलीप भरड यांनी ही माहिती देताना सांगितले की, अहिल्यानगर जिल्हा भौगोलिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पुण्याशी अधिक जवळ असल्यामुळे ही फेररचना करण्यात आली आहे. त्यामुळे समन्वय, परीक्षा व्यवस्थापन, प्रमाणपत्र वितरण आणि विद्यार्थ्यांशी संवाद यामध्ये गती व अचूकता येईल.
हा निर्णय विद्यार्थी, पालक, केंद्रप्रमुख आणि शिक्षक व समन्वयकांसाठी लाभदायक ठरणार असून यामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व गतिशीलता येईल, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा : साप्ताहिक ई- मार्मिक
