अहमदनगर | १२ जुलै | प्रतिनिधी
(World news) ‘त्वचेच्या आरोग्याशिवाय आरोग्य नाही’ या संकल्पनेवर आधारित इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, व्हेनेरिओलॉजिस्ट अँड लेप्रोलॉजिस्ट (IADVL) तर्फे १३ जुलै २०२५ रोजी देशभरात ५५० हून अधिक मोफत त्वचा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचा माहिती अहिल्यानगर डर्माटोलॉजी सोसायटीचे सचिव डॉ. राजीव सूर्यवंशी यांनी दिली.
(World news) अधिक माहिती देताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १८२०० हून अधिक सदस्य असलेली IADVL ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसरी सर्वात मोठी त्वचारोगतज्ज्ञ संघटना असून, लोकांमध्ये त्वचारोग, केस, नखे व गुप्तांगांच्या समस्या याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. शिबिरांमधून केवळ पात्र त्वचारोगतज्ज्ञांकडून सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. टॉपिकल स्टिरॉइड्सचा गैरवापर टाळण्याचा, आणि त्वचेचे विकार केवळ सौंदर्यात्मक नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही परिणाम करणारे असतात याची जाणीव करून देणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
(World news) कोड, सोरायसिस, कुष्ठरोग आणि एचआयव्ही/एड्स यासारख्या आजारांबाबतचे गैरसमज दूर करणे, तसेच योग्य उपचार आणि लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिबीरांचा उपयोग होणार आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
अहिल्यानगर डर्माटोलॉजी सोसायटीचे सचिव डॉ. राजीव सूर्यवंशी यांनी आवाहन केले की, निरोगी त्वचा, निरोगी शरीर आणि निरोगी राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवे. अहमदनगरमधील हे शिबीर सिव्हील हॉस्पीटल येथे रविवारी ता. १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.