श्रीरामपूर | ९ जुलै| प्रतिनिधी
(Rip news) येथील नगरपालिका शिक्षण मंडळातील मराठी शाळेच्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती सिराजुन्निसा गफूर खान पठाण उर्फ सि.ग. पठाण मॅडम (वय ८१) यांचे मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आकस्मिक निधन झाले.
(Rip news) त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांवर प्रेम करणारी आणि शाळेतील सर्वांनाच आपलेपणाने वागवणारी शिक्षिका म्हणून नाव मिळवले होते. त्यांच्या शिकवणुकीतून अनेक विद्यार्थी घडले. शिक्षक बँकेचे शाखाधिकारी फयाज पठाण व सामाजिक कार्यकर्ते नियाज पठाण यांच्या त्या मातोश्री होत.
(Rip news) त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा दफनविधी श्रीरामपूर येथील कब्रस्तानात मंगळवारी रात्री पार पडला.
