पंढरपूर | ७ जुलै | प्रतिनिधी
(Cultural Politics) पवित्र आषाढी एकादशीच्या पर्वकाळात महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूर येथे वारकरी यांचा महामेळावा पार पडला. या निमित्त माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले व श्रीसंत ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांचा आशीर्वाद घेतले.
(Cultural Politics) यावेळी डॉ. स्वामी यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. आपल्या समाजमाध्यमावर पोस्ट करताना त्यांनी स्पष्ट केले की, “माझी जनहित याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनातून सरकारचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
(Cultural Politics) तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे आवाहन केले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने न्यायालयात या भूमिकेला पाठिंबा द्यावा व लवकरात लवकर मंदिर व्यवस्थापन पुजारी, भाविक भक्त आणि वारकऱ्यांच्या हाती सोपवावे. यावेळी डॉ. स्वामींनी “सत्य संकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ।” उल्लेख करत भक्तीभाव व्यक्त केला.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
