कोल्हापूर | ५ जुलै | प्रतिनिधी
(Politics) महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार मनिषाताई कायंदे यांना भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांची योग्य समज देण्यासाठी ‘संविधान संवादक’ टिमने पुढाकार घेतला आहे.
(Politics) ‘संविधान संवादक’ टिमचे सदस्य राजवैभव शोभा रामचंद्र यांनी स्पष्ट केले की, “मनिषाताईंसारख्या लोकप्रतिनिधींची संविधानिक मूल्यांबाबतची मर्यादित समज महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी आणि समाजासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आम्ही त्यांना संत साहित्य आणि संविधान यांच्यातील सुसंगती समजावून सांगू इच्छितो.”
(Politics) संवादक टिमने यासाठी खास संवादशाळेचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, आमदार मनिषाताईंसाठी ही संवादशाळा पूर्णपणे मोफत असेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
“जर त्यांच्या संविधानिक मूल्यांची समज वाढली तर भविष्यात ते कोणतीही चुकीची विधाने करणार नाहीत, अशी आम्हाला आशा आहे,” असे राजवैभव शोभा रामचंद्र यांनी सांगितले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
