अहमदनगर | ३० जून | प्रतिनिधी
(Public issue) आर्थिक अडचणीत सापडलेल्या नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. ₹५ लाखांवरील ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींपैकी ५० टक्के रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक सहाय्यता केंद्राने दिली आहे.
(Public ississue) यासंदर्भात आपले नाव ठेवीदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ठेवीदारांनी नगर अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयाशी ०२४१-२३४३६४१, ०२४१-२३४३६४२ या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी मिलिंद अंचवले यांच्याशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
(Public issue) दरम्यान, बँक बचाव समितीने ठेवीदारांना आवश्यक त्या सर्व माहितीसाठी ९४२३७९३३२१ या क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत गेल्या काही काळात चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, ५०% रक्कम वितरणाची ही प्रक्रिया ठेवीदारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
