मुंबई | ४ मे | गुरुदत्त वाकदेकर
(Ipl) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. १८ वर्षांची प्रतीक्षा संपली. अखेर विराट कोहली कर्णधार असताना जे शक्य झालं नाही ते रजत पाटिदारने शक्य करून दाखवलं. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ सात गडी गमावून केवळ १८४ धावा करू शकला. आयपीएल विजेता बनणारा आरसीबी आठवा संघ आहे.
(Ipl) यापूर्वी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ चॅम्पियन बनले आहेत. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने खराब सुरुवात केली. फिल साॅल्ट नऊ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावा काढून बाद झाला. त्याला जेमिसनने बाद केले. यानंतर विराट कोहलीने मयंक अग्रवालसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूचा पाठलाग करताना मयंक बाद झाला. १८ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा काढून तो बाद झाला. यानंतर रजत पाटीदार १६ चेंडूत २६ धावा करून तंबूमध्ये गेला.
(Ipl) विराटने लिव्हिंगस्टोनसोबत ३६ धावांची भागीदारी केली. विराटने ३५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ४३ धावा काढून अजमतुल्लाहचा बळी ठरला. जितेश शर्माने धमाकेदार खेळी केली, पण मोठ्या शॉटचा पाठलाग करताना तो विजय कुमारने बाद केला. जितेशने १० चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २४ धावा काढल्या. अर्शदीपने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. त्याने २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोमारियो शेफर्ड (१७ धावा), चौथ्या चेंडूवर कृणाल पंड्या (४ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (१ धावा) यांचे बळी घेतले. पंजाबकडून अर्शदीप आणि जेमिसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याच वेळी, अझमतुल्लाह उमरझाई, विजयकुमार विशाख आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
१९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात चांगली झाली.
