Crime | उद्योजकांनो, एकत्र येऊन अन्यायाविरोधात आवाज उठवा !

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • एकजूटीचे आवाहन

अहमदनगर | ३१ मे | प्रतिनिधी

(Crime) अहिल्यानगर एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योगधंद्यांचा झपाट्याने होणारा विकास हा संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही समाजकंटकांनी या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. दमदाटी, जबरदस्ती आणि धमक्यांच्या घटनांमुळे या उद्योजकांवर मानसिक आणि आर्थिक दबाव वाढत आहे.

 (Crime) सदर समाजकंटकांनी अलीकडेच एका समाजसेवकाच्या जयंतीनिमित्त उद्योजकांकडे पंचवीस हजार रुपये किंमतीच्या तेलाच्या डब्यांची मागणी जबरदस्तीने केली, जे अत्यंत निंदनीय आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. अशा प्रकारामुळे केवळ त्या उद्योगांचीच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर एम.आय.डी.सी. परिसराची आणि शहराची प्रतिमा धुळीस मिळत आहे.

  (Crime)  या गंभीर परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आणि आपले अधिकार व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी, आम्ही सर्व उद्योजकांना आवाहन करतो की : आपण एकत्र यावे आणि या अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करावा.
जे कोणी अशा प्रकारच्या धमक्यांचा किंवा दमदाटीचा बळी ठरत असतील, त्यांनी तात्काळ खालील संघटनांशी संपर्क साधावा : MCCI (Ahmednagar), महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशन, आमी औद्योगिक संघटना. तसेच, मा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, उद्योग मंत्री व पोलीस प्रशासन यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवावी.
आपला एकत्रित आवाजच या प्रकारांना थांबवू शकतो. चला, उद्योजकतेचा विकास व परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी पुढे येऊया. संघटित व्हा – सुरक्षित राहा – प्रगती साधा!

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *