(Literature) येथील कोडोलीमधे अजिंक्य साहित्यसंगम राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा रविवारी ता.११ मे रोजी पार पडला. यावेळी पंढरपुरचे लेखक गणेश आटकळे यांना गुजरातमधील अहमदाबाद येथील पलपब प्रकाशन संस्थेकडून साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(Literature) यावेळी ज्येष्ठ लेखक अनिल बोधे, लेखक सुरेश शिंगटे, कवी हनुमंत चांदगुडे, ज्येष्ठ साहित्यिक गणपतराव कणसे, विजय वेटम, प्रतिक मतकर, पलपब साहित्य संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना पाटील, ज्येष्ठ साहित्यिका अनिता नलगे तसेच महाराष्ट्र अध्यक्ष किरण तोडकर, संदीप पवार, रेखा दीक्षित आदी साहित्यिक उपस्थित होते.
(Literature) साहित्यिकांनी आटकळे यांच्या शोधक पुस्तकाबद्दल आपल्या भावना मांडल्या. या काव्यसंग्रहानिमित्त त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.