अहमदनगर | ४ मे | प्रतिनिधी
(Politics) माजी आमदार कै. अरुण बलभीम जगताप यांचे पुणे येथे उपचारादरम्यान नुकतेच निधन झाले. आज ता.४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या निवासस्थानी भेट देत मुलगा संग्राम जगताप, सचिन जगताप तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
(Politics) यावेळी आमदार शिवाजी भानुदास कर्डिले, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
(Politics) यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अरुणकाका जगताप यांच्या दु:खद निधनाने सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. स्व. अरुणकाका जगताप यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चोखपणे काम करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. जगताप कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करत त्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी माजी आमदार कै. अरुण जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
