पिंपरी चिंचवड | २८ एप्रिल | प्रतिनिधी
(Social) मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही रथयात्रा बुधवारी ता.३० रोजी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत आहे. या रथयात्रेचा मुख्य उद्देश सामाजिक समता व सलोखा निर्माण करणे, संविधानाचे महत्व समाजास पटवून देणे, मराठा बहुजन समाजात जागृती निर्माण करणे. सध्या जातीयवाद, धर्मवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक आणि राजकीय उन्माद यासह अनेक कारणांनी सामाजिक एकता, सलोखा धोक्यात आला आहे. समाजा-समाजामध्ये संशयाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकरी, कामगार, युवक, युवती, विद्यार्थी तसेच समाजातील सर्वच घटकांशी संवाद साधून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सामाजिक ऐक्याचा जागर करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून मराठा जोडो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
(Social) संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर व मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वात रथयात्रेची सुरवात १८ मार्च रोजी भोसले गढी, वेरूळ येथून झाली. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ही रथयात्रा बुधवारी ३० तारखेला पुणे जिल्ह्यात येत आहे. ३० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जिजाऊ रथयात्रा डांगे चौक थेरगाव येथे येणार आहे.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
(Social) यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. ही रथ यात्रा पूर्ण शहरात फिरणार असून स्वागत व जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी डांगे चौक येथे दुपारी ३ वाजता खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार शंकर जगताप, माजी नगरसेवक राहुल कलाटे तसेच दुपारी ३.३० वा. चाफेकर चौक चिंचवड येथे विधान परिषद आमदार उमा खापरे,लमाजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अनंत कोऱ्हाळे, अश्विनी चिंचवडे याचप्रमाणे सायं. ४.१५ वाजता पेट्रोल पंपाजवळ, चिंचवड स्टेशन येथेआमदार अमित गोरखे, माजी नगरसेवक मारुती भापकर, शरद थोरात यांच्या उपस्थितीत रथ यात्रेचे स्वागत व जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे.
नंतर रथयात्रा मोरवाडी अजमेरा मार्गे सायंकाळी ५ वाजता नेहरूनगर येथे येणार आहे. यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेवक समिर मासुळकर तसेच सायं. ६ वा. पी.सी.एम.टी. चौक भोसरी येथे रथयात्रेचे आगमन होणार आहे. यावेळी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे, माजी नगरसेवक रवि लांडगे, विलास मडेगरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा चौक लांडेवाडी येथे माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांचे वतीने जिजाऊंना अभिवादन करून रथयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच अग्निशामक केंद्र, बुद्ध विहार चौक संत तुकारामनगर येथे सायंकाळी ७.१५ वाजता माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक यशवंत भोसले, बबनराव गाडवे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, सुजाता पाडाळे, मुक्ता पडवळ, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रथयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
रात्री आठ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात रथयात्रेचे आगमन होणार आहे. यावेळी समारोपीय सभा होणार असून रथयात्रेचे प्रमुख संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर व मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे मार्गदर्शन करणार आहेत. सभेचे अध्यक्ष जनचळवळीचे ज्येष्ठ नेते मानव कांबळे आहेत. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नामदार आण्णा बनसोडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धिकभाई शेख, क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग परचंडराव, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रथयात्रेच्या नियोजनासाठी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा.रामकिशन पवार, ॲड. लक्ष्मण रानवडे, वसंत पाटील, वाल्मिक माने, प्रकाश बाबर, दिलीप गावडे, अशोक सातपुते, मोहन जगताप, विजय शिंदे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संघटक मनोज गायकवाड, सिद्धार्थ कोंढाळकर, शहराध्यक्ष सतिश काळे, प्रवीण कदम, नकुल भोईर, श्रीकांत गोरे, सदाशिव लोभे, आप्पा चांदवडे, विवेक गायकवाड तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनिषा हेम्बाडे, शहराध्यक्षा सुलभा यादव, विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे, वृषाली साठे, माणिक शिंदे, शितल घरत, अश्विनी पाटील, हेमा ग्यानी, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर आदींसह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.