
मुंबई | १५ एप्रिल | प्रतिनिधी
(Cultural Politics) येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधे पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्या वतीने ‘अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४’ आयजित करण्यात आला होता. यामधे अभिनेत्री दिपाली सय्यद यांना तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमास सभापती राम शिंदे उपस्थित होते.

(Cultural Politics) यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ.मुरहरी केळे, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मपीठचे संस्थापक सागर धापटे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पुरस्कार विजेते व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Cultural Politics) या सोहळ्याच्या निमित्ताने समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, कला-संस्कृती आणि सार्वजनिक जीवनातील अहिल्यादेवींच्या विचारसरणीशी सुसंगत योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक विचार, एक प्रेरणा, आणि एक जीवंत परंपरा आहेत. त्यांच्या स्मृती जपणं, आणि त्यांच्या आदर्शांनुसार समाजकार्य करणाऱ्यांना सन्मान देणं, हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरतो, असे सभापती राम शिंदे यावेळी म्हणाले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.