अहमदनगर | १४ एप्रिल | प्रतिनिधी
(Politics) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला अहमदनगरच्या जनतेने मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून येथील जनता त्यांच्यासोबत होती. डॉ.बाबासाहेब अनेकदा अहमदनगर परिसरात आले होते. त्यांनी प्रत्यक्ष भेटून येथील जनतेला न्याय दिला. त्यांनी आपला थॉटस ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सावेडी-भिस्तबाग परिसरातील पटवर्धन बंगला येथे लिहला होता. माळीवाडा महालक्ष्मी मंदिर येथे त्यांनी व्यापक बैठक घेतली होती. त्यांना येथील आयुर्वेदिक डॉक्टर गुणे यांच्याकडून मधुमेहावर औषध घेतले होते. आजच्या सिध्दार्थनगर येथील सोमवंशी बोर्डींग येथे भेट देवून कामकाजाची माहिती घेतली तसेत येथील शेरेबुकात नोंद केली होती. या व अशा अनेक आठवणी जुनी जाणती मंडळी सांगत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या सर्व ठिकाणांचे स्मृतीफलक येथे लावून त्यांच्या स्मृती जतन कराव्यात तसेच जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी संध्या मेढे यांनी केली.
(Politics) इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्या बोलत होत्या. यावेळी इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, ॲड.संतोष गायकवाड, आबिद दुल्हेखान, पंकज गुंदेचा, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
