अहमदनगर | ७ एप्रिल | दिपक शिरसाठ
(Crime) येथील मुक्त पत्रकार किरण डहाळे यांना, “मी एक्साईज पीएसआय शिंदे बोलतोय” असा फोन करून पोलिसी भाषेत दम देण्याचा प्रकार अज्ञात इसमाकडून करण्यात आला. ही बाब किरण डहाळे यांनी कोतवाली पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असून पोलिसांनी तोतया पीएसआय शिंदे याचा मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला आहे. या मोबाईल क्रमांकाची ट्रु कॉलर या ॲप्लिकेशनद्वारे खात्री केली असता, या मोबाईल क्रमांकाला अनेकांनी स्पॅम असे रिपोर्ट केलेले आहे. एका ॲपधारकाने हा शिंदे नामक व्यक्ति मी एक्साईजचा पीएसआय असून पैशांची मागणी करत असल्याचे नोंद केले आहे.
या अज्ञात इसमाचा मोबाईल क्रमांक +918999316681 असा असून या क्रमांकावरून कुणालाही फोन आला तर घाबरून न जाता जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन जागरुक नागरिक किरण डहाळे यांनी केले.
(Crime) हा इसम फोनद्वारे स्वतःला छत्रपतींचा मावळा म्हणवून घेत आहे आणि विनाकारण वाद वाढवून आपल्याकडून चुकीचे शब्द यावेत असे त्याच्या मोबाईलवरील संभाषणातून लक्षात येते. तेव्हा या व्यक्तिचा कुणालाही फोन आला तर शक्य झाल्यास तो रेकॉर्ड करून ठेवावा व पोलिसांकडे त्याची रीतसर तक्रार करावी, असे आवाहन किरण डहाळे यांनी केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.