पुणे | ६ एप्रिल
प्रति,
चंद्रकांत पाटील,
आमदार, कोथरूड विधानसभा मतदारसंघ, पुणे, महाराष्ट्र
दादा, तुमच्या मतदारसंघात एका रुग्णालयात जे रुग्णालय महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. अशा रुग्णालयात एक महिला पैशाअभावी ट्रीटमेंट न दिल्यामुळे दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्युमुखी पडली आहे. एवढंच काय तर या प्रकरणामुळे या रुग्णालयातील अनेक काळी प्रकरणे बाहेर आली आहेत. ज्या प्रकरणांवर अनेक माध्यमांनी आवाज उठवला आणि सामान्य लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला.
दादा, पण हा आवाज कोथरूड मतदारसंघात राहून तुमच्यापर्यंत पोहोचला नाही का ? दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात चाललेल्या अनागोंदी कारभारावर आपण काहीच प्रतिक्रिया दिली नाहीत. आपण आपल्या मतदारसंघाचे देखील पालक आहात हे आपण विसरलात का ? की, आपल्या सरकारचे अपयश आपल्याला मान्य करायचे नाही. फक्त मंडळांना वर्गण्या देऊन मतदारसंघ बांधता येत नसतो, दादा. मतदारसंघात जे जे काही सार्वजनिक आहे, ते ते उत्तम करण्याने मतदारसंघ बांधला जात असतो.
आपण या पत्राची दखल घेऊन आपल्या व्यस्त अशा शेड्युलमधून वेळात वेळ काढून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट द्याल, ही अपेक्षा मला अजिबात नाहीये. पण तुमच्या मतदारसंघात काय घडत आहे हे तुम्हाला सांगावे म्हणालो. समजलंतरठीक.
– पैगंबर शेख, पुणे, महाराष्ट्र
९९७००७०७०५
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

