अहमदनगर | ५ एप्रिल | समीर मन्यार
(india news) जमिनीची मोजणी प्रक्रिया पारंपारिक पद्धतीमुळे वेळखाऊ आणि गुंतागुंतीची होती. यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. या समस्याची जाण ठेवत महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे . सेतू केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक जलद आणि पारदर्शक ई मोजणी व्हर्जन टू ही प्रणाली विकसित केली आहे. राज्यातील जिल्ह्यामध्ये 30 प्रणाम केंद्राचे उभारणी केली असून. या केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले .या प्रणाम केंद्रामध्ये संगणीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, रंगीत नकाशे, फेरफार नोंदणीचे उतारे अशाप्रकारे महत्त्वाची सर्व कागदपत्रे एकाच छताखाली सहज मिळणार आहेत. त्या माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना लवकर आणि पारदर्शक सेवा मिळणार आहे. भू प्रणाम केंद्र नागरिकांसाठी अत्याधुनिक सेवा केंद्र असल्याचे प्रतिपादन भूमी अभिलेख चे जिल्हा अधीक्षक अविनाश मिसाळ यांनी केले.
(india news) राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये भू प्रणाम केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन पुणे येथून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यानगर येथे भू प्रणाम केंद्र लोगोचे अनावरण भूमी अभिलेखचे प्रभारी जिल्हाअधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधीक्षक भूमी अभिलेख राहुरी मनीषा धिवर, संदीप गोसावी (नेवासा) ,रवी डीक्रूज शिरस्तेदार उपअधीक्षक भूमिअभिलेख (नगर), सुहास जाधव (श्रीगोंदा) आदींसह भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(india news) पुढे बोलताना मिसाळ म्हणाले की, हे भू प्रणाम केंद्र सुसज्ज असून प्रशिक्षित कर्मचारी येथे असणार आहेत. ई मोजणी व्हर्जन टू ही प्रणाली अत्यंत विकसित असून नागरिकांना मोजणीची तारीख वेळ आणि भूमापकाचे नाव तसेच शुल्क याची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे. अर्जाची सद्यस्थिती यांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार असल्याचे ते म्हणाले .
(india news) यावेळी बोलताना नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे म्हणाले की नागरिकांना एका छताखाली सर्व माहिती मिळणार आहे . ही एक वेगवान आणि पारदर्शक प्रणाली आहे .यासाठी शासनाने शासकीय शुल्क निश्चित केले असून त्यामुळे नागरिकांचा होणारा अतिरिक्त खर्च यामुळे टळणार आहे. भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने नागरिकांचा खाजगी केंद्रांकडून होणारा अतिरिक्त खर्च थांबवण्यासाठी ई मोजणी व्हर्जन टू ही प्रणाली विकसित करण्यामागचा शासनाचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले.
हे हि वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.