श्रीरामपूर | २९ मार्च | सलीमखान पठाण
(Biodiversity) श्रीरामपूर नगर परिषदेचे १०० दिवशीय ७ कलमी कृती आराखडा या उपक्रमांतर्गत बीजगोळे तयार करणे या उपक्रमासाठी शहरातील बचतगट व नगरपालिका शाळा यांचा समावेश केला. लोकमान्य टिळक वाचनालयात मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
(Biodiversity) माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्रीरामपूर नगरपरिषद १०० दिवसीय ७ कलमी कृती आराखडा माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बीज गोळे (Seed Balls) बनविण्याची कार्यशाळा लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती.
बिजगोळा :
बीजगोळे (सीड बॉल्स) बनवण्याची प्रक्रिया आणि वापर- मिश्रण, माती व कंपोस्ट एकत्र करणे.
पाणी मिश्रण- माती चिकट होईपर्यंत हळू हळू पाणी मिसळले. मातीचे गोळे बनवुन थोडी माती घेऊन त्यात छोटा खड्डा केला. त्यात बियाणे टाकले आणि त्याचा गोळा बनवला.
सीड बॉल सुकवणे- बीज गोळे २४ ते ४८ तासाच्या कालावधीसाठी सूर्यप्रकाश नसणाऱ्या खोलीत सुकवावे.
वापर- ठरवलेल्या ठिकाणी बीज गोळे लावा किंवा पसरवा. ४८ तास अंधाऱ्याखोलीत ठेवून पावसाळ्यात त्याचा वापर करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.
(Biodiversity) यावेळी प्रशासक किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीर, प्रशासनाधिकारी संजीवन दिवे, ग्रंथपाल स्वाती पुरे, बचतगटप्रमुख वर्षा पाठक, आस्थापन प्रमुख प्राची चितळे, रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, शहर समन्वयक प्रमोद चव्हाण, मंगल रेड्डी, साक्षी अहिरे, राजू बोरकर, यश अहिरे, स्वप्निल माळवे, राजेश जेधे, विजय झिंगारे, दीपक व्यवहारे, सिद्धार्थ गवारे, संभाजी त्रिभुवन, शहरातील बचतगट व न.पा.शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी नगरपालिका शाळेच्या कल्पना जगताप, सोमनाथ काळे, सचिन शिंदे, कौसर अलीमोद्दीन, समीनाबानो इब्राहिम, शगूफ्ता खान, सना पठाण, मिनाज शेख, अस्माजबीन पटेल, स्मिता गायकवाड प्राची लोळगे आदी उपस्थित होत्या.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.