Ipl | दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; आशुतोष शर्माची तुफानी खेळी ! - Rayat Samachar

Ipl | दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; आशुतोष शर्माची तुफानी खेळी !

rayatsamachar
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २५ मार्च | गुरुदत्त वाकदेकर

(Ipl) २४ मार्च रोजी इंडियन प्रिमियर लीगच्या झालेल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर अविस्मरणीय विजय मिळवला. २१० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने १९.३ षटकांत ९ विकेट्स गमावत २११ धावा करत रोमांचक विजय मिळवला. आशुतोष शर्मा यांच्या स्फोटक अर्धशतकाने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

(Ipl) लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०९/८ अशी भक्कम धावसंख्या उभारली. निकोलस पूरनच्या ७५ (३०) आणि मिचेल मार्शच्या ७२ (३६) धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. दिल्लीच्या मिचेल स्टार्कने ४ षटकांत ४२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.Ipl

(Ipl) प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. ७ धावांवर ३ विकेट्स पडल्याने संघ अडचणीत होता. मात्र, आशुतोष शर्मा (६६ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) आणि विप्राज निगम (३९ धावा, १५ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) यांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकांत दिल्लीला ८ धावांची गरज असताना त्यांनी ३ चेंडूत सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा १ गडी राखून पराभव केला. आशुतोष शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा रोमांचक सामना चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या आगामी सामन्यांसाठीही अशीच उत्कंठा टिकून राहणार आहे.

आजचा सामना : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संध्याकाळी ७:३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

हे ही वाचा : साहित्यवार्ता | नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी

- Advertisement -

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading