अहमदनगर | १९ मार्च | रसिका चावला-लायल
(Health) इंदोर घराण्याचे महान शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित अमरनाथ यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त दि साल्वेशन आर्मी इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटलमधे सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, पाटिल हॉस्पिटल, समता फाऊंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात येणार आहे. शनिवारी ता.२२ मार्च रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत सर्व वयोगटातील नवजात शिशु, लहान मुले, महिला, पुरुष व वयोवृद्ध यांच्यासाठी अनेक तज्ञ नामवंत डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. यामधे कॅन्सर, त्वचेचे आजार, नेत्र तपासणी, दंत चिकिस्ता, मधुमेह, लठ्ठपणा, सांधेदुखी गुडघेदुखी, हाडांचे विकार, मूळव्याध, बालरोग निदान, आतड्याचे, लिव्हर, किडणीचे विकार आदींची मोफत तपासणी तसेच रक्त तपासणी केली जाईल.
(Health) पुणे येथील रूबी हॉलचे डॉ.हेमंत केमकर (हेड, नेक मॅक्सीओ फेशियल कॅन्सर सर्जन), डॉ.अनिल जाधव (एम.डी. मेडिसिन, सामान्य आजार तज्ञ), डॉ.वेदांत लढ्ढा (त्वचारोग तज्ञ), डॉ.सोनल बोरुडे (स्त्रीरोग सल्ला व मार्गदर्शन), डॉ.शेहनाज आयुब (बालरोग तज्ञ), डॉ.रुपेश सिकची (लहान बालकांचे सर्जन), डॉ.राहुल कांडेकर (लिवर ट्रान्सप्लांट व गॅस्ट्रो सर्जन), डॉ.महेश कर्डिले (रेडिओलॉजिस्ट), डॉ.ज्योत्स्ना भराडिया (मधुमेह व हृदयरोग तज्ञ), डॉ.विजय पाटिल व डॉ.सौरभ ओहळ (एम.एस. ऑर्थो, अस्थिरोग तज्ञ), डॉ.सोमेश्वर गायकवा (एम.डी. मेडिसिन), डॉ.कीर्ती सोलट (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), डॉ.सुभम बोज्जा (नेत्रतज्ञ) डॉ.ममता कांबळे (दंत चिकित्सक), शितल शिंदे (आहार तज्ञ) आगी तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
(Health) समता फाऊंडेशन – एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्याद्वारे मोफत नेत्र तपासणी करुन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बूथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे यांनी केले. शिबिर यशस्वितेसाठी अनूप चावला हे विशेष सहकार्य करत आहेत.
शिबीराचे ठिकाण : बूथ हॉस्पिटल, एस.बी.आय. चौकाजवळ, जनरल पोस्ट ऑफिससमोर, अहमदनगर. संपर्क : ०२४१ २३४५०५९, ब्र.प्रवीण साबळे- 9270070846, ब्र.अमित पठारे- 8975372254.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.