Politics | राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश “अंधश्रद्धेतून बाहेर या” ; मनसे 19 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘टास्क’ ?

उपसंपादक | दिपक शिरसाठ

Politics पिंपरी चिंचवड | ९ फेब्रुवारी | प्रतिनिधी

(Politics) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज श्रीकांत ठाकरे यांनी मनसैनिकांची कानउघाडणी करत ‘अंधश्रद्धेतून बाहेर येण्याचे’ आवाहन केले. राज ठाकरे यांचे आवाहन म्हणजे मनसैनिकांसाठी “आदेश” असतो. जसे “खळ्ळ खट्याक” आदेश देताच मनसैनिक पुढाकार घेतात, तसेच “अंधश्रद्धेतून बाहेर या” या आदेशाला मनसैनिक किती प्रतिसाद देतात हे पाहणे पक्षहिताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. हिच ‘खमकी भुमिका’ राज ठाकरे घेणार असतील तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणातही त्यांना आणखी ‘स्पेस’ मिळू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

 

(Politics) ता.९ मार्च रोजी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना १९ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी वरील “आदेश” दिलेला आहे. यावेळी त्यांनी गंगा प्रदूषण आणि एकंदरीत राज्यभरातील नदी प्रदूषणाच्या महत्वाच्या विषयाला हात घातला.

 

(Politics) ठाकरे यांनी राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांचे ‘प्रबोधन’ करताना अनेक किस्से सांगितले. काही आदेश दिले, त्यापैकी अंधश्रद्धेचा आदेश महत्वाचा आहे. यामुळे ‘ते प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस नक्की वाटतात’, अशी राज्यभर चर्चा आहे. या अंधश्रद्धेच्या आदेशामुळे रा.स्व.संघ व भाजपाचे लोक संतापले असून त्यांच्या ‘सांस्कृतिक राजकारणा’ला खोडा बसणार आहे, असे स्पष्ट दिसते. रा.स्व.संघ व भाजपा इतर पक्षातील देवभोळ्या कार्यकर्त्यांना ‘सांस्कृतिक राजकारणाच्या जाळ्यात’ नेहमीच अडकवित असतात, त्यासाठी ते देव, धर्माचे फंडे वापरून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना ‘कामाला’ लावत असतात. प्रबोधनकार के.सी. ठाकरे यांचे नातू असलेल्या राज ठाकरेंच्या या आदेशाने रा.स्व.संघ व भाजपाची ‘मनसे रसद’ काही प्रमाणात तुटणार असल्याचा हा संकेत दिसत आहे. ‘महाराष्ट्र धर्मा’चे राजकारण करणारांकडून ठाकरेंच्या या भुमिकेचे स्वागत होत आहे.

हे ही पहा : राज ठाकरेंचा संबंधित व्हिडीओ पहा

याविषयी प्रतिक्रिया देताना मिडीया भारत न्यूजचे संपादक राज असरोंडकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर मनापासून एकत्र आले तर भाजपाचं महाराष्ट्रद्वेषी राजकारण आणखी नीच पातळीला उतरेल आणि त्यावेळी संघीभाजपाई हिंदुत्व काय लायकीचं आहे, ते उभ्या महाराष्ट्राला कळेल. येत्या काळात संघीभाजपाई हिंदुत्व आणि महाराष्ट्रीय पुरोगामित्व यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होईल. नव्हें, ती काळाची गरज आहे.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *