बीड, परळी वैजनाथ | ९ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(India news) शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मागील दोन वर्षांपासून परळी आणि धारूर तालुक्यातील तब्बल २५ पेक्षाअधिक गावातील शेतकरी आणि गावकरी यांनी तुकाराम बीजेनिमित्त सुरू केलेला शेतकरी किर्तन महोत्सव सोमवार ता.१० मार्च रोजी सकाळी १० वाजता कान्नापूर येथील बसस्थानकजवळ सुरू होत आहे.
(India news) तुकाराम महाराज बीजेचे औचित्य साधून २५ गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक अनोखी अध्यात्मिक चळवळ सुरू केली आहे. कीर्तन, भजन या अध्यात्मिक उपक्रमाबरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्न या कीर्तन महोत्सवात मार्गदर्शक केले जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे आरोग्यावर दिग्गज डाॅक्टरांनी मार्गदर्शन करतानाच आरोग्य तपासणी केली होती. तर यावर्षी शाश्वत शेतीवर चिंतन करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
(India news) शेतकरी केंद्रबिंदू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी शाश्वत शेती विषयावर दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यात्मिक चळवळीतू शेतकऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विकासाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासह अनेक मान्यवर या कीर्तन महोत्सवात मार्गदर्शन करणार आहेत.
या शेतकरी कीर्तन महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन जागतिक कीर्तीचे मृदंगाचार्य ह.भ.प. उद्धवबापू आपेगावकर व पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज यांचे वंशज व मठाधिपती ह.भ.प. भरत महाराज जाधव यांच्या हस्ते कलश, वीणा, मृदंग व टाळ पूजनेने होणार आहे. तर सायंकाळी नामवंत कवी अनंत राऊत, कामगार नेते डॉ. डी.एल.कराड यांच्या उपस्थितीत या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
शाश्वत शेती हा या वेळचा मुख्य विषय असून त्याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, वनस्पतीतज्ञ बशीर शेख, जलतज्ञ विजयअण्णा बोराडे, कृषी तज्ञ बालाजी लोहकरे, पीक पद्धती बदलतज्ञ इरफान शेख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.