मुंबई | ५ मार्च | प्रतिनिधी
(History) हिंदू धर्मप्रेमानं भारावलेल्या माझ्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं आपला हिंदू धर्म खतरेमे आलाय. फक्त तुम्ही वाचवू शकता.
(History) मीसुद्धा हिंदू आहे भावा. आपल्यात फक्त धर्म सांगणं ‘इनफ’ नसतं, ‘जात’ ही हवीच. म्हणून सांगतो की मी मराठा आहे. पण माझं हिंदुत्व वारकरी संप्रदायाचं… प्रेम शिकवणारं… तथागत बुद्धांच्या विचारांना आपलंसं करणारं आणि सुफी विचारांशी बंधुत्व ठेवणारं. सगळ्या जातीधर्मांना समान मानणारं साधं हिंदुत्व आहे माझं… पण तुझं हिंदुत्व जबरदस्त आग ओकणारं ! आम्हाला माणूस दिसला की पहिली ‘माणुसकी’ दिसते. तू माणूस पाहिलास की पहिल्यांदा त्याचा धर्म शोधतोस. प्रखर जळजळीत हिंदुत्व. त्यामुळं तूच आता आपला धर्म वाचवू शकतोस.
(History) मला सांग दोस्ता, तू छावा बघून रडलास ना? मस्तच. सिनेमा संपल्यावर घोषणाही दिल्यास म्हणे. ग्रेटच ! त्याच नीच औरंग्याला साथ देणाऱ्या कारस्थानी जमातीतल्या एका भिकमंग्या प्रशांत कोरटकराच्या मोबाईलमधनं गेलेल्या कॉल मधून आपल्या हिंदू धर्मरक्षक छाव्याविषयी अपशब्द वापरले गेलेत… आणि तरीही तो मोकाट सुटलाय… आता आपल्या लाडक्या छाव्याला सणसणीत शिव‘संवैधानिक’ न्याय द्यायची संधी चालून आलीय. आपण खरे हिंदू आहोत.
चल दाखव दणका त्याला हिंदूंचा…
आपल्या राजाची आन बान शान राख !
(History) आणि भावा तू ! घरात काय बसलायस? बाहेर ये. ऐक… तू सुद्धा शिवप्रेमाचा ठेका घेतलेल्यांबरोबर हातात काठी वगैरे घेऊन गडकिल्ल्याच्या मोहिमा करतोस म्हणे? ग्रेटच. सलाम तुला. चल, आता शिवरायांचा अत्यंत अश्लील शब्दात अपमान करणारा प्रशांत कोरटकर सापडलाय… सोलापूरकरानं तर राजांना लाचखोर ठरवलंय ! एक ‘हिंदू’ या नात्यानं तुझ्या तळपायाची आग मस्तकात गेली असणार. कोरटकर आणि सोलापूरकर दोघंही त्याच भिकार विचारधारेची बांडगुळं आहेत, ज्यांनी हरामी मुघलांना राजांच्या खबरी दिल्या होत्या. आता हिंदूंची शिव ‘संवैधानिक’ ताकद दाखवायची वेळ आलीय. घे भगवा हातात आणि रक्षण कर आपल्या संपत चाललेल्या हिंदूत्वाचं !
(History) कॉलेज, परीक्षा, नोकरी, धंदा सोडून शिवप्रेमापोटी गडकिल्ल्यांच्या मोहिमा करणाऱ्या माझ्या भावा… यापुढे औरंग्याच्या पायचाटू जमातीची हिंमत नाय झाली पाहिजे आपल्या हिंदू धर्माच्या रक्षकांबद्दल एक शब्दही बोलायची ! शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होऊन पुतळा कोसळला… पुतळा बनवणाऱ्या आपटेनं राजांच्या कपाळावरच्या जखम पुन्हा ओली केली होती तेव्हा तुझ्या गुरुजींनी गप्प बसवल्यामुळं तू गप्प बसलास. परवा मी त्या गुरुजींवर पोस्ट केल्यामुळं तुला राग आला होता की नाही? तू लगेच माझी तीच बदनामी करायचा ‘अपयशी’ प्रयत्न केलास, जी बदनामी सावरकर, गोळवलकरांनी छ. संभाजीराजांची केली होती. पण मला वाईट वाटले नाही. “वेडा रे वेडा” म्हणत मी हसलो. मी समजू शकतो तुझा राग… पण आत्ता धर्म संकटात असताना तुझे भिवून गप्प बसणे समजत नाही यार ! त्या गुरुजीना म्हणावं आपल्या हिंदूंच्या राजमातेचं चारित्र्यहनन झालंय हो !! आपल्याला कुणी आईवरून शिवी दिली तर राग येतो की नाही आपल्याला? त्या बांडगुळानं आपल्या राजा शिवाजींना… बोलवत ही नाही रे ! जा. गुरूजींचा आशिर्वाद घेऊन जा. त्या कोरटकर आणि सोलापूरकर या शिवद्रोह्यांचा शिव ‘संवैधानिक’ मार्गानं हिशोब चुकता कर…
आणि तू रे भावा, तिकडे दरे गावाला गेल्यासारखा अज्ञातवासात कुठे बसलायस? तू तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गुवाहाटीमार्गे सत्तेत गेलेल्यांना मानतोस ना? व्वा… धर्मवीर सिनेमाही पाहिलास?? लैच खतरनाक ! तुझ्या धैर्याचं कौतुक. तो सिनेमा आणि त्यातला अबब अभिनय पहायला खूपच सहनशीलता आणि धाडस लागतं ! असो. आता तुला धर्मवीरांचा वारसा चालवायचाय यावर फोकस कर.
(History) शिवरायांवर सिनेमे बनवणारे आणि शिवरायांच्या भुमिका करणारे मराठी कलाकार शिवविचारांनी भारलेले असतील हा भ्रम सोडा. ते यावर बोलणार नाहीत. त्यांना शिवरायांचा अपमान वगैरे गोष्टीशी काही देणेघेणे नसते. पैसे मिळाले विषय संपला. फुलेंवरच्या सिनेमाचा हिरो कधी फुलेविचारांवर हिरीरीनं बोलताना पाहिलाय? छ्छे ! मध्यंतरी एक वेडसर अभिनेता ट्रोल झाल्यावर खचून म्हणाला, ‘यापुढं मी शिवरायांची भुमिका करणार नाही.’ तो गैरसमजात होता की तुम्ही तरसताय त्याच्या अभिनयासाठी ! असली ‘कॉमेडी’ जमात ही. अर्थात त्यांची चूक नाही. चूक तुमची आहे. म्हणून सांगतो माझ्या हिंदू बांधवांनो, सिनेमाची दुनिया फसवी असते. सिनेमा म्हणजे ‘इतिहास’ नाही, हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. असो.
चला माझ्या सकल हिंदू भावांनो… उठा… जागे व्हा… एक व्हा… बटेंगे तो कटेंगे ! नाहीतर उद्या सोलापूरकर, कोरटकर, आपटे आणि त्यांना गरळ ओकायला बळ देणारी ही औरंग्याची पिलावळ आपला हिंदू धर्म संपवल्याशिवाय रहाणार नाहीत.
उठा. शिवरायांच्या भगव्याचा मान राखा !
जय श्रीराम 🚩 जय शिवराय 🚩🚩
हर हर महादेव !
– किरण माने.