मुंबई | २५ फेब्रुवारी | गुरुदत्त वाकदेकर
(History) काळाचौकी, परशुराम नगर येथील चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती स्पर्धेत सादर करण्यात आल्या. स्पर्धकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे जिवंत दर्शन घडवले.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघांचे यश
प्रथम क्रमांक – पन्हाळा – विशालगड (पावनखिंड)
द्वितीय क्रमांक – किल्ले प्रतापगड
तृतीय क्रमांक – किल्ले रायगड
उत्तेजनार्थ पारितोषिक – किल्ले तोरणा
स्पर्धेचे आयोजन चिंतामणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक म. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
(History) बक्षीस वितरण समारंभात अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई शहर सरचिटणीस, प्रशासन उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच काळाचौकी पोलीस स्टेशन मोहल्ला कमिटी सदस्य महेंद्र तावडे, साहित्यिक-पत्रकार गुरुदत्त वाकदेकर आणि रमेश धुमाळे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे कौतुक केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन राम कदम यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले.
स्पर्धकांसाठी खास उपक्रम
(History) इतिहासाचा वारसा केवळ किल्ल्यांपुरता सीमित न राहता, पुढील पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून सर्व स्पर्धकांना ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सिनेमागृहात दाखवण्यात आला.
तसेच २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सर्व स्पर्धकांना मोफत रायगड किल्ले दर्शन घडवण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद कदम, निलेश यादव, केतन चव्हाण आणि संभाजी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा मिळाला आहे.
विभागातील नागरिक अशा उपक्रमांचे स्वागत करत असून, दीपक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या पुढाकारामुळे भविष्यातही अशाच स्पर्धा सातत्याने व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे हि वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक