वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी
नगर तालुका | २४ फेब्रुवारी | संदिप पवार
(Agriculture) तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथील भोन्याई डोंगर पायथ्याच्या काळेवस्तीवर काल ता.२३ रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान बिबटने हल्ला केला. बाहेर पडवीत शेतकरी पोपट काळे झोपलेले होते त्यांच्या शेजारीच त्यांचा लाडका कुत्रा मोती झोपला होता. पहाटेच्या दरम्यान दबक्या पावलाने येत तगड्या बिबटने ‘मोती’ला पकडले. उचलून नेत असताना जवळीत भांड्यांवर बिबट अडखळल्याने त्याचा मोठा आवाज ऐकूण पोपटराव उठले. मुले आकाश व प्रकाशला जोरात आवाज देत कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने निघाले. आधी त्यांना वाटले रानडुक्कर असावे.
व्हिडीओ पहा : https://youtu.be/Ck4whWov-uA?si=EgrS4p-66OgQXqf1
(Agriculture) मोतीची सुटका झाल्यावर सकाळी त्यांनी सीसीटीव्हीमध्ये पहिले असता त्यांना धक्का बसला. कारण मोती कुत्रा पोपटराव यांच्या पायाजवळच झोपलेला होता. आपल्यावरील मोठे संकट मोतीमुळे टळल्याचे त्यांना जाणवले.
(Agriculture) वनविभागाला या आधीही परिसरातील शेतकऱ्यांनी बिबटची माहिती दिली होती. या घटनेनंतर वनविभाग कर्मचारी यावरून गेले. या भागात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बिबट संबंधित बातमी पहा : https://youtu.be/68UNgMYaEvo?si=EqpQ_R872bFOdU6j