Social: येरेकर साहेब, जरा इकडंही लक्ष केंद्रित करा ! - Rayat Samachar
Ad image

social: येरेकर साहेब, जरा इकडंही लक्ष केंद्रित करा !

उपसंपादक | दिपक शिरसाठ

ग्यानबाची मेख

अहमदनगर | २५ जानेवारी | राजेंद्र देवढे; विशेष प्रतिनिधी

(social) श्रीमान आशिष येरेकर साहेब, आपण परवा पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील इंदिरानगर प्राथमिक शाळेस भेट दिल्यानंतर, एका प्राथमिक शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा सूमार असल्याच्या कारणावरुन त्यांना निलंबित केल्याचे वृत्त वाचण्यात आले. तसा, आपल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचा मला अधिकार नाही. परंतु, अशी तत्परता आपण इतर बाबतीत दाखवत नाहीत, यावर माझा रास्त आक्षेप आहे.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

(social) मुख्यमंत्री (Devendra Fadanavis) महोदयांनी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. त्यानुसार, आपण जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या व पुर्णत्वास गेलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचेही समजते. अर्थात, आपल्या कृती आराखड्यात नेमकं काय समाविष्ट आहे, हे आपणालाच ठाऊक आहे. शैक्षणिक क्षेत्रही याला अपवाद नसावं. म्हणूनच कदाचित आपण हा ‘आपटबार’ काढला असावा. तसंही काहीतरी हटके करुन स्वतःची वेगळी इमेज तयार करणं गरजेचं आहे. अलिकडे राजकारणात तर हे आवर्जुन बघायला मिळतं. ‘मिशन आरंभ‘ शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा ही आपली अभिनव संकल्पना कौतुकास्पदच म्हणावी लागेल. कारण, आपणांसारखे प्रयोगशील अधिकारी अभावानेच आढळतात. ते आमच्या जिल्ह्याला लाभले, हे आमचं अहोभाग्य म्हणावं लागेल. फुले दांपत्याच्या कार्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर यानिमित्ताने त्या नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी आपलं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
परवा, तिसगावात आपण जो ‘रामशास्त्री बाणा’ दाखवला, तसाच इतर क्षेत्रांतही दाखवला तर हा अहिल्यानगर जिल्हा कृतकृत्य होईल. फक्त त्यासाठी एकमेव सॉफ्टटार्गेट असलेलं शैक्षणिक क्षेत्र निवडू नका. शासनाच्या ज्या काही जनहिताच्या योजना आहेत, तिथं काय काय चाललंय हे आपणांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला नक्कीच ठाऊक असेल. कामांच्या व्यापामुळे जर आपल्या अपरोक्ष काही अनुचित प्रकार होत असतील तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. परंतु जाताजाता आपण, आमच्या जिल्ह्यातील भ्रष्टाचार नाहीसा करावा, ही विनंती.

 

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व काही पुर्णत्वास गेलेल्या पेयजल योजनांचं आपण ‘शवविच्छेदन’ केलं तर आमच्या जिल्ह्यावर आपले फार उपकार होतील. परवा आपण दिलेल्या एका शिक्षकाच्या निलंबनाच्या आदेशामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारण, तो फक्त ट्रेलर असावा असं आम्हाला वाटतं. तसंही अगदी गावगन्ना पुढारीही शिक्षक नावाच्या अश्राप प्राण्यावर रुबाब करत असतोच.

 

सामाजिक आचारसंहिता पाळण्याचं व्रत फक्त शिक्षक आणि पत्रकारांनी पाळायचं असतं, हा अलिखित नियमच झाला आहे. उडदामाजी काळेगोरे, या लोकोक्तीप्रमाणे त्यांच्यात काही अपवाद असूही शकतात. म्हणून इतर क्षेत्राकडे कानाडोळा का करावा ! त्यासाठी आपण एकवार संपूर्ण जिल्हा शुद्धीकरण मिशन राबवावं, असं वाटतं. विहिरी, गायगोठे, रस्ते, घरकुले व पेयजल योजनाच काय अगदी शौचालयांच्या बाबतीतही किती भ्रष्टाचार होत आहे, हे एकदा याचीदेही याचीडोळा आपण पाहिलं तर ‘जिल्हा शुद्धीकरण मिशन’ आपण नक्कीच राबवाल यात तीळमात्र शंका नाही.
हे ही वाचा : epaper ची संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 हे झालं फक्त आपल्या विभागापुरतं ! बाकी महसूल विभागाचं तर विचारायलाच नको. तिथं तर इतका ‘आदर्श’ कारभार सुरू आहे की, संजय निराधार योजना, श्रावणबाळ योजना, नवीन किंवा गहाळ झालेल्या शिधापत्रिका यासारख्या अनेक कामांत तुम्हाला रामराज्याचं मूर्तिमंत प्रतिबिंब दिसेल. असो. काही चुकलंमाकलं असेल तर माफ करा. परंतु जरा इकडंही लक्ष केंद्रित करा, हे जाता जाता सागावं वाटलं म्हणून हा लेखण प्रपंच…!

हे ही वाचा : india news: हिंदूंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नदीतील मासे खावेत की नाही? सत्येंद्र पीएस संपादित सनातन धर्माचा आयुर्वेद मांसाहार संदर्भ असलेला ‘औषधी ग्रंथ’ : मांसौषधि

Share This Article
Leave a review