कोपरगाव | १७ जानेवारी | किसन पवार
(public issue) शहरातील जुन्या प्रभाग क्रमांक १ मधील खडकी, रेणुकानगर, साईलक्ष्मी नगर, देवकर प्लॉट, समतानगर, भामानगर, शिंगी-शिंदेनगरमधील प्रलंबित कामे प्राधान्यांने लवकरांत लवकर करून मिळावे, यासाठी दिपक जपे यांच्यासह खडकी प्रभागातील नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप यांना नुकतेच निवेदन दिले. ही कामे तातडीने पूर्ण झाली नाही तर ता. २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला.
(public issue) नगरपालिकेवर सध्या मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोपरगाव शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी याविषयी नागरिकांमधून नेहमीच नाराजी प्रकट होत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आदी करून मूलभूत सुविधा नागरिकांना विनासायास मिळणे गरजेचे असतानाही त्यासाठी नागरिकांना उपोषण करण्याची वेळ येते, हे तसे पाहिले तर प्रशासनाचे अपयशच म्हटले पाहिजे.
खडकी भागातील महिला स्वच्छता गृहांची दुरावस्था झालेली आहे त्याची तातडीने दुरूस्ती करणे, या भागातील मुख्य गटार खोदकाम करून ठेवली आहे त्याचे काम संथगतीने होत आहे ते तातडीने पूर्ण करणे, शिवजयंतीनिमित्त प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक सुशोभीकरण करावे, पथ दिवे दुरुस्त करून मिळावे तसेच ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी नव्याने पथदिवे टाकणे तसेच प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत दुरुस्ती करून घेणे व मंजूर असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करणे आदी सह कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण करण्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच ही कामे तातडीने पूर्ण झाली नाही तर २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला.
(public issue) त्यामुळे आता नगरपालिका ही कामे खरोखरच किती तातडीने करणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवेदनावर माजी नगरसेविका ताराबाई जपे, दीपक जपे, अमजद शेख, राजू वाकळे, खंडू वाघ, राजू शेख, पप्पू दिवेकर आदी नागरिकांच्या सह्या आहेत.
हे हि वाचा : बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी