अहमदनगर | १६ जानेवारी | तुषार सोनवणे
(education) येथील जगप्रसिद्ध भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या अहमदनगर विद्यालयातील बी.बी.ए. आणि बी.कॉम. (बिजनेस मॅनेजमेंट) विभागातर्फे ‘NEXGEN 2025’ मॅनेजमेंट एक्झिबिशन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक भन्साळी टी.व्ही.एस. तर सहप्रायोजक राजभोग स्वीट आणि द माय स्टिक आय हे होते. प्रदर्शनात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, परफ्यूम, बेकरी, खाद्यपदार्थ, ज्वलरी, मोबाईल्स असे ५५ पेक्षा जास्त विविध प्रकारचे स्टॉल्स थाटले होते.
(education) विद्यार्थ्यांना जे अभ्यासक्रमात शिकवले जाते त्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल, टीमवर्क, डिसीजन मेकिंग आशा गुणांमधे वाढ होण्यास मदत व्हावी, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, असे प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस यांनी सांगितले.
प्रदर्शनाला विद्यार्थ्यासह नगरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अभिनंदन भन्साळी, जितेंद्र खंडेलवाल आणि साक्षी मुनोत यांचा सत्कार बी.बी.ए. विभागप्रमुख तुषिता अय्यर यांनी केला. प्रदर्शनाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले त्यांना प्रा. तृप्ती कोठारी, प्रा. सपना स्वामी, प्रा. शितल कुलकर्णी, प्रा. हरित गांधी, प्रा. मोनिका खुबचंदाणी, प्रा. निकिता गुगळे, प्रा. अबोली पुंड, प्रा. हिर खानचंदाणी, हृषीकेश गायके यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी विद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, कमिटी हेड, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन प्रा. शितल कुलकर्णी यांनी केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर