राज की बात | १४ जानेवारी | संतोष पद्माकर पवार
(history) ता.१४ जानेवारीच्या ‘लोकसत्ता’मध्ये आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कऱ्हाड भेटीत संघशिबिराला भेट दिली असल्याचा काहीतरी ‘कपोलकल्पित’ प्रसंग सांगत सागर शिंदे म्हणून कुणी संघवाल्याने लेख ‘झाडला’ आहे. त्याला त्याकाळातल्या केसरीचा आधार दिला आहे. (तो खरा कशावरून म्हणायचा?)
(history) मुळात त्यादिवशी काय घडले? हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणखंडात या दिवशीबद्दलचा वृत्तांत आणि भाषण आहे. ते खालीलप्रमाणे…
भाषण क्र. १७०
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत.
ता. २ जानेवारी १९४० रोजी संध्याकाळी ४ वाजता कऱ्हाड म्युनिसीपालिटीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्याचे ठरविले होते. या समारंभासाठी डॉ. बाबासाहेब सातारहून सुमारे ३ वाजता जाण्यास निघाले. सातारहून १३ मैलांच्या अंतरावर गाडी नादुरुस्त होऊन पुढे जाणे अशक्य झाले. थोड्यावेळात मुंबई येथील परळ भागातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी रा. लक्ष्मणराव शेटे हे आपल्या खाजगी मोटारीतून जात असता त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना कऱ्हाडपर्यंत नेण्याचे मोठ्या आनंदाने कबूल केले. याच गाडीस कऱ्हाडजवळ एक भयंकर अपघात झाला. सुदैवाने गाडीतील उतारु मरणाच्या दारातून वाचले. कोणासही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या नाहीत. डॉ. आंबेडकरांच्या डोक्यास, पायास व हातास मार बसला होता. गाडीतील मार लागलेल्या सर्व जणास सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी सरकारी दवाखान्यात नेले व त्यांना पट्ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी विश्रांती घेतल्यानंतर डॉ. आंबेडकर सुमारे ६ च्या सुमारास म्युनिसीपालिटीतील मानपत्र समारंभास जाण्यास निघाले. म्युनिसीपालिटीचा हॉल आतून व बाहेरून सभासदांनी व इतर नागरिकांनी फुलून गेला होता. प्रथमतः स्थानिक स्पृश्य विद्यार्थिनींनी स्वागतपर पद्ये म्हटली व समारंभास सुरुवात करण्यात आली. पद्ये म्हणून झाल्यावर रा. बहुलेकर वकील यांनी म्युनिसीपालिटीचे मानपत्र वाचून दाखविले. म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष रा. कदम यांनी हे मानपत्र डॉ. बाबासाहेबांस अर्पण केले. मानपत्र अर्पण झाल्यावर डॉक्टरसाहेब उत्तर देण्यासाठी उभे राहिले.
….( पुढे भाषण आहे…ज्यात टिळक आणि गांधी दोघांच्या राजकारणावर टीका आहे)
पुढे तिसऱ्या पानावरील मजकूर जाणकारांनी वाचावा. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनक्रम स्पष्ट होतो.
” त्यानंतर स्थानिक महारवाड्यातील समारंभास डॉक्टरसाहेब हजर राहिले.
तेथे अलोट जनसमुदाय दुपारी चार वाजेपासून डॉक्टरसाहेबांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिला होता. जमलेल्या मंडळीस आपसात एकोपा राखण्यास व पुढील निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचा एक प्रतिनिधी निवडून आणण्यास सांगून डॉक्टरसाहेब आपल्या बरोबरील मंडळीसह साताऱ्यास आपल्या निवासस्थानी गेले…” असा स्पष्ट उल्लेख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी ‘अपघात’ घडला असता त्यात पुढे संघशिबिर, केसरी, बंधुता परिषद आली कुठून?
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविणे
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर