social: ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांची 59 वी पुण्यतिथी 14 जानेवारीला - Rayat Samachar
Ad image

social: ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांची 59 वी पुण्यतिथी 14 जानेवारीला

उपसंपादक | दिपक शिरसाठ

राजेंद्र देवढे । विशेष प्रतिनिधी | १२ जानेवारी

(social) विसाव्या शतकातील महान संत वैकुंठवासी ह.भ.प. श्री भगवानबाबा यांची ५९ वी पुण्यतिथी यावर्षी मंगळवार ता.१४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे.social

(social) याविषयी सविस्तर माहिती अशी की, बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक आणि पहिले महंत ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांची ५९ वी पुण्यतिथी यावर्षी १४ जानेवारी रोजी येत आहे. गडाच्या परंपरेनुसार संत भगवानबाबांच्या समाधीचा महाभिषेक सकाळी होणार. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे हरिकीर्तन होईल. आलेल्या समस्त भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. पुण्यतिथी सोहळ्यासाठी संत भगवानबाबांचे देशभरातील भाविकभक्त बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्री क्षेत्र भगवानगडावर संत भगवानबाबा यांचे स्वप्न असणारे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे भव्यदिव्य मंदिर महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.

(social) भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन आणि माऊली मंदिराचे काम डोळे भरून पाहण्यासाठी भाविकभक्त लांबून येत असतात. आलेल्या भाविकांच्या दर्शनाची आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गडाचे विश्वस्त मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविक यांच्या सहभागातून करण्यात येते. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसेंदिवस भगवानगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
(social) महंत नामदेव महाराज शास्त्री यांची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात ज्ञानेश्वरी भावकथेमुळे पोहोचली आहे. आनंदाचे सिद्धांत सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे पुण्यतिथीला महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे अमृततुल्य कीर्तन प्रत्यक्ष ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी भगवानगडावर होत असते. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी आणि भाविक भक्त भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भगवानगडावर येतात. भाविकांनी यावर्षी देखील शिस्तीत संत भगवानबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.

यावर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती गोविंदराव सानप हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी श्री क्षेत्र भगवानगडाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी epaper Rayat Samachar येथे वाचा 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

हे हि वाचा :  श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
Leave a comment