india news: पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात यावा - बीएसपीएसचे राष्ट्रीय सहसचिव श्रीकांत काकतीकर यांची 8 व्या राष्ट्रीय परिषदेत मागणी - Rayat Samachar
Ad image

india news: पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात यावा – बीएसपीएसचे राष्ट्रीय सहसचिव श्रीकांत काकतीकर यांची 8 व्या राष्ट्रीय परिषदेत मागणी

उपसंपादक | दिपक शिरसाठ

देशभरातील पत्रकार बीएसपीएस संघटनेशी जोडलेले आहेत

कोलकता | ११ जानेवारी | प्रतिनिधी

(india news) हावडा येथे भारती श्रमजीवी पत्रकार संघाची ८ वी तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी बीएसपीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पांडे होते. परिषदेचे संचालन राष्ट्रीय सरचिटणीस शाहनवाज हसन यांनी केले.

(india news) यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष पांडे यांनी, बंगालच्या पार्श्वभूमीवर ९ जानेवारीच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत अनेक रंजक माहिती सांगितली. बीएसपीएसचे राष्ट्रीय सरचिटणीस शाहनवाज हसन यांनी भारती श्रमजीवी पत्रकार संघाविषयी माहिती देताना सांगितले की, आज देशभरातील पत्रकार संघटनेशी जोडले गेले आहेत. प्रत्येकाने कुटुंबाप्रमाणे एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

संघटनेचे राष्ट्रीय सहसचिव श्रीकांत काकतीकर यांनी बेळगाव आणि सीमा भागातील मराठी पत्रकारांच्या समस्या मांडताना, केंद्र आणि राज्य शासनाने डिजिटल माध्यमांत काम करत असलेल्या प्रतिनिधींना लवकरात लवकर मान्यता द्यावी. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, या संदर्भात आपले विचार मांडले. या परिषदेत पश्चिम बंगाल पत्रकार संघटनेच्या वतीने श्रीकांत काकतीकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
हरियाणा श्रमजीवी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष आणि भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.इंदू बन्सल जैन यांनी सांगितले, हरियाणात आम्ही पत्रकारांसाठी श्रमजीवी पत्रकार संघ हरियाणाचे सदस्यत्व शुल्क फक्त १० रुपये ठेवले आहे, जे देशभरात एक उदाहरण आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनाही सरकारकडून मान्यता आणि सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आम्ही हरियाणा सरकारकडे केली.
तीन दिवसीय चर्चासत्रात बीएसपीएसचे राष्ट्रीय सहसचिव सय्यद नसरीन, बीएसपीएस बंगालचे राज्याध्यक्ष शैलेश्वर पांडा, सचिव वाणीव्रत कारा, संघटन सचिव सौरव सिन्हा, उपाध्यक्ष सुजित पाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने देशभरातील पत्रकारांचे स्वागत केले. बंगाल बीएसपीएसचे सर्व राष्ट्रीय अधिकारी आणि सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांशिवाय अनेक देशांतील पत्रकारही या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले.

(india news) यावेळी मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष डॉ.अरुण सक्सेना म्हणाले, पत्रकाराचा अचानक मृत्यू झाला की कुटुंबासमोर अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात. मध्य प्रदेशातही पत्रकारांना संघर्षाचा सामना करावा लागत आहे. ज्या पत्रकारांचे मत सरकारला मान्य नाही अशा पत्रकारांवर खोटे गुन्हेही दाखल केले जातात. छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष गंगेश द्विवेदी म्हणाले, राज्यात पत्रकारांवरील हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे आव्हाने वाढली आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार बेफिकीर आहे. आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष वीर भद्र राव म्हणाले, मी १९७८ पासून पत्रकारितेत आहे. आज पत्रकार का रडत आहेत हा चिंतेचा विषय आहे. आजकाल पत्रकारांबाबत कोणी गंभीर नाही. पत्रकार जे समजतात ते लिहित असतात. आता सर्व पत्रकारांना नियोजन करून काम करावे लागणार आहे. आज सर्व राज्यातील पत्रकारांनी भारती श्रमजीवी पत्रकार संघाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी संस्थेच्या ‘चौथ्यास्तंभ’ मासिकासाठी एकत्र काम करा.india news

 (india news) चेन्नई येथे पुढील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव तामिळनाडू प्रदेशाध्यक्षांनी मांडला.

 

Read This: History: The Indians: A Useful Reference Book for Scholars of South Asian History

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
Leave a comment