रायगड | १० जानेवारी | सोपान अडसरे
(mumbai news) खालापूर तालुक्यातील वावर्ले येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल विद्यालयात ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले अंतर्गत ‘माझी वसुंधरा’ अभियानास नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक पाटील व्ही.जी., अडसरे एस.सी., पवार एस.यु. आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामधे हरितसेना युनिटमधील विद्यार्थी सहभागी झाले.
(mumbai news) यावेळी अडसरे एस.सी. यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून परिसरातील वृक्षांची माहिती दिली. पवार एस.यु. यांनी विद्यार्थ्यांना परसबागेचे महत्व सांगून विविध पालेभाज्या आणि फळभाज्यांची माहिती दिली. हरितसेना विभागप्रमुख पाटील व्ही.जी. यांनी ‘माझी वसुंधरा’ या शासकीय उपक्रमाची माहिती दिली.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर